आंबेनळी घाट बस दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू

पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी (दि.28) बस कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पोलादपूरजवळ झालेल्या आजच्या दुर्दैवी अपघातामधे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच बसचे चालक यांना प्राण गमवावे लागल्याचे समजून आपणास धक्का बसला व तीव्र दुःख झाले. सर्व मृतांच्या कुटुंबियांना व आप्तजनांना मी आपल्या शोकसंवेदना कळवित आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे

OUR POPULARITY