कुळ कायदा म्हणजे काय ?

कसेल त्याची जमीन असे तत्व घेऊन कूळ कायदा अस्तित्वात आला कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले.
सन १९३९ च्या कूळ कायद्यानुसार सर्वप्रथम जमीनीत असणाऱ्या कायदेशीर कूळाची नांवे ७/१२ च्या इतर हक्कात नोंदली गेली. त्यानंतर १९४८ चा कूळ कायदा अस्तित्वात आता. त्याने कूळांना अधिक अधिकार प्राप्त झाले. सुधारित कायद्यानुसार कलम-३२-ग नुसार दिनांक १.४.१९५७ रोजी दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या करणाऱ्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहिर करण्यांत आल्या. या जमीनी यथावकाश प्रत्यक्ष प्रकरणाच्या निकालाप्रमाणे कूळांच्या मालकीच्या झाल्या. गेल्या ४० वर्षामध्ये राज्यातील बहुसंख्य कूळ कायद्याच्या प्रकरणांचा निकाला लागला आहे. तरीदेखील वेगवेगळया कारणामुळे किंवा वरिष्ठ न्यायालयात चाललेल्या अपिलांमुळे अजूनही कूळ कायद्यांचे हजारो दावे प्रलंबित आहेत.
संयुक्त कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींनी जमीन कसली तर ती जमीन मूळ खातेदाराने स्वत:च कसली असे कुळकायदा मानतो. अनेकवेळा एका चांगल्या उददेशासाठी निर्माण झालेल्या कायदयाचा उपयोग काही हितसंबधी लोक अशा चुकीच्या पध्दतीने घेतात!
शेतकरी कुटुंबातील एक जण पोट भरण्यासाठी शहरात राहायला गेला. त्याची जमीन त्यांचा भाऊ कसत होता. पुढे कालांतराने भाऊ मयत झाल्यावर त्यांची मुले जमीन कसू लागली. काही दिवसांनतर गावातील लोक त्या मुलांना म्हणू लागले की, अरे जमीन तुम्ही कसता व जमीनीला मात्र तुमच्या चुलत्याचे नाव? झालं. पुतण्यांना जमीनीची हाव सुटली. हळूच त्यांनी 7/12 वर वहिवाटीला नावे लावून घेतली व जमीनीचे कुळ असल्याचा दावा दाखल केला. त्याचे नातेवाईक म्हणू लागले, अरे तुझ्याच चुलत्याची जमीन आहे त्याला फसवू नका. पाच वर्षानंतर शेवटी दाव्याचा फैसला झाला. निकालपत्रात मात्र घरातील माणूस कूळ होऊ शकत नाही असे म्हटले होते. आता त्या मुलांना आपली चूक कळून चुकली.

Comments

Popular posts from this blog

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस 2019