apla job com web is for such person that who wanted government exam update regularly its also type of naukari margdarshan kendra or career guidance center or sarkari job alert from Maharashtra aapla job com for as new or navin jahirat new hall ticket

Friday, August 17, 2018

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आज आपल्यात नाही राहीले

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे आज आपल्यात नाही राहीले....

त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाविषयीची थोडी माहिती...🙏

अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातलं एक बुलंद व्यक्तिमत्व...

आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वानं देशाची प्रगती साधणारा पंतप्रधान...

जगभरच्या नेत्यांशी संवाद साधत विश्वबंधुत्वासाठी झटणारा एक मुत्सद्दी...

आपल्या वाणीनं करोडोंना मंत्रमुग्ध करणारा अमोघ वक्ता...

काव्यशास्त्र विनोदात  रमणारा कवी मनाचा राजकारणी...

अशा कितीतरी रुपांनी अटल बिहारी वाजपेयींना भारतीयच नव्हे तर जागतिक  राजकारणावर आपल्या कर्तृत्वानं अमिट असा ठसा उमटवलाय...

२५ डिसेंबर, १९२४ ला सुरु झाला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या या झंझावाताचा प्रवास...

१९५१ पासून भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी १९५७ मध्ये पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. भारतीय जन संघाचे खासदार ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान हा प्रवास अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वीपणे केला. सत्तेत असो किंवा नसो, चार दशकांपेक्षा जास्त काळ वाजपेयींनी संसदेत आपला दबदबा कायम ठेवला. नऊ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या वाजपेयींना दुसऱ्या लोकसभेपासून १३ व्या लोकसभेपर्यंत आपली छाप पाडली. खासदार म्हणून संसद गाजवणारे अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा मंत्री झाले ते जनता सरकारच्या काळात... पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र खात्याची जबाबदारी १९७७ ते १९७९ या काळात यशस्वीपणे पेलली.

पंतप्रधान वाजपेयी
१६ मे १९९६ हा दिवस ऐतिहासिक महत्त्वाचा ठरला... याच दिवशी अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पण लोकसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यानं त्यावेळचं वाजपेयी सरकार केवळ तेरा दिवस टिकलं. ३१ मे १९९६ ला वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला. पण हिंमत न हारता वाजपेयी पुन्हा लोकांना सामोरे गेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा १९९८ मध्ये सत्तेत आली. पण राजकीय घटनाक्रमानं वेगळं वळण घेतलं आणि वाजपेयी सरकार पुन्हा अल्पमतात गेलं. १६ एप्रिल १९९९ ला आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी वाजपेयी सरकारला अपेक्षित पाठिंबा दिला नाही आणि केवळ एका मतानं वाजपेयी सरकार गडगडलं. याची खंत मतदारांना होती.

अटल बिहारी वाजपेयी १३ व्या लोकसभेत प्रवेश केला तोच मोठी अपेक्षा ठेवत. वाजपेयी तब्बल नऊ वेळा खासदार म्हणून विजयी झाले होते यावेळी  ते पुन्हा पंतप्रधान बनले. १३ ऑक्टोबर १९९९ ला अटल बिहारी वाजपेयींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हा कार्यकाळ १३ मे २००४ पर्यंत टिकला. एकूण तीन वेळा वाजपेयी पंतप्रधान झाले. वाजपेयींचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला... आपल्या ठाम नेतृत्वाची झलक अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात दाखवून दिली...

१३ मे १९९८ : पोखरण
अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारतानं पोखरण इथं अणुचाचणी घडवून आणली. पंतप्रधान झाल्यावर केवळ एक महिन्याच्या आत वाजपेयींनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यावेळी सारा देश वाजपेयींच्या मागे उभा राहिला... अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघानं  भारतावर निर्बंधही लादले पण आर्थिक आघाडीवर पावलं उचलत वाजपेयींनी देशाला त्याची झळ लागू दिली नाही. भारत एक महाशक्ती म्हणून जगात उभा राहण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले... सगळ्यांशी मैत्री राखत जागतिक शांततेसाठी योगदान देणे हाच वाजपेयींच्या नेतृत्वचा अग्रक्रम होता... पाकिस्तानसोबतही वाजपेयींना मैत्रीचे संबंध हवे होते. त्यामुळेच फेब्रुवारी १९९९ ला लाहोर दिल्ली बस सेवा सुरु केली.

एकीकडे वाजपेयी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत असतानाच पाकिस्ताननं मात्र काश्मिरमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषेजवळच्या टेकडयांवर चढाई केली. १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान पंतप्रधान वाजपेयींनी आपल्या सैनिकांच्या पाठिशी खंबिरपणे उभं रहात देशाच्या सीमांचं संरक्षण केलं... ऑपरेशन विजय यशस्वी करत वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जीवाची बाजी लावत आपल्या जाबाँज सैनिकांनी घुसखोरांना सीमेपार पळवून  लावलं. पाकिस्तानचा डाव उधळून लावत भारताचा तिरंगा वाजपेयींनी फडकता ठेवला...

वाजपेयी सरकारच्या काळात देशानं काही महत्त्वाच्या संकटांचाही सामना  केला. १९९९ मध्ये तालिबान अतिरेक्यांनी विमान अपहरण करुन भारत सरकारला कोंडित पकडलं. अखेर तीन अतिरेक्यांच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका करुन घेण्यात वाजपेयी सरकार यशस्वी झालं. त्यावेळी टीकेचा सामनाही सरकारला करावा लागला. २००१ मध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला आणि सगळा देश हादरला. या दोन्ही घटना पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणाऱ्या ठरल्या. अशा

No comments:

Post a Comment

येथे COMMENT करा