apla job com web is for such person that who wanted government exam update regularly its also type of naukari margdarshan kendra or career guidance center or sarkari job alert from Maharashtra aapla job com for as new or navin jahirat new hall ticket

Thursday, July 30, 2020

सोयाबीन मध्ये वापरण्यात येणाऱ्या chemical विषयी सामान्य ज्ञान

*शेतकऱ्यांना माहिती आसावी*
*1)क्लोरमेक्वाट क्लोराईड ---::* वाढ निंयञक
*2)एन ए ए ---::* नैसर्गीक गळ थांबवीणे
*3)जि ए --::* पेशीची संख्या वआकार वाढविणे
*4)नायट्रोबेंझीन ---::* कळी व फुले काढणे
*5)टायकंटेनाॅल--::* प्रकाश सश्लेषण वाढविणे. . ...... . 
 *6)ह्युमिक अॅसीड 6% --::* सुपीकता वाढविणे ,
*7)ह्युमिक अॅसिड 12 %वर --::* पाढ-या मुळाची वाढ .......
*8)बायो स्टिमुलंट--::* नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे ....
*9)सुक्ष्म अन्नद्रव्ये --::* पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे .......
*10)स्टिकर --::* पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.. .......
*11)अमिनो अॅसीड--::* हिरवे व कोवळेपणा वाढविणे
*12)अँन्टीआॅक्सीडंट--::* झाडाला तारूण्य वाढविणे... .... .
*13)प्रथम अन्नद्रव्ये --::* नञ, स्फुरद, पालाश ..
*14)दुय्यमअन्नद्रव्ये--::* मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक
*NPK*:- नत्र-स्फुरद-पालाश
*19:19:19*:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी
*12:61:00*:-फुटवा जास्त येण्यासाठी
*18:46:00*:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
*12:32:16*:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
*10:26:26* :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी
*00:52:34*:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
*00:00:50*:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.
🌿 कृषिसेवा 🌿
हे माहीत आहे का?
मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ
विद्राव्य खतांचे कार्य...
🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०*
या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._
🌿 *१२:६१:०*
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. _नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो._
🌿 *०:५२:३४*
या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. _फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते._
🌿 *१३:०:४५*
या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. _फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात._
🌿 *०:०:५०+१८*
या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. _पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते._
🌿 *१३:४०:१३*
पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.
🌿 *कॅल्शियम नायट्रेट -*
मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.
🌿 *२४:२४:०*
यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाखीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.💐💐💐

No comments:

Post a Comment

येथे COMMENT करा